BLOG | झाड आणि त्याची फळे यांचा संबंध विसरून चालणार नाही..!

पाशवी बलात्कार व निर्घृण हत्या या प्रामुख्याने सर्वसाधारण पापभिरु जनतेला धक्का पोहचवण्यासाठीच घडवल्या जात असाव्यात. एका प्रदेशात अशी घटना घडली की तिथल्या राजकीय वा व्यावसाईक स्पर्धा त्यामागे असू शकते.

लेखक : गिरीधर पाटील, नाशिक

आर्थिक देण्याघेण्याचे व्यवहार, त्याची वसूली वा फसवणुकीचे प्रकारही त्यामागे असू शकतात. सूडाच्या भावनेचे विहित परिमार्जन झाले नाही कीही अशा घटना घडू शकतात. या घटनातील पाशवी अत्याचार बघता त्यामागची कारणेही ओळखत केवळ गुन्हेगारांचा फाशी द्या वा शिक्षा करा यापुरती सिमित राहू नये. खरे म्हणजे हा समाजातील राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा परिपाक असतो. समाजातील इतर अनिष्ट गोष्टी तशाच ठेवत, प्रसंगी त्यांचे उदात्तीकरण होत असले तर समाजाप्रति काही तरी करु इच्छिणाऱ्यांच्या मनात घृणा पैदा होऊ शकते. व याच समाजावर सूड घेण्यासाठी वा लक्ष वेधून घेण्यासाठी असे प्रकार केले जाते. यात बऱ्याचदा धर्म व जाती रक्षणाचा नारा देत भाविकांना हौताम्य पत्करण्याचे आमिष दाखवले जाते.

यात काही राजकीय विचारांचाही समावेश होतो. यात जे गुन्हेगार पकडले जातात त्यांची असे गुन्हे करण्याची इच्छा वा क्षमता याचा शोध घेतला असता त्यात काही संतुलन सापडत नाही. म्हणजे गुन्हा करण्यातील जोखीम, त्यातले धोके व मिळणारा परतावा यात काही ताळमेळ नसतो. गुन्हेगारांना काही तिरस्कारणीय शब्द वापरून त्यांची संभावना केली की हा शोध मागे पडतो व खरी कारणे बाजूला पडतात. म्हणजे एकंदरीत व्यवस्था वा समाज याला एकादे झाड समजले तर त्याला लागणारी फळे व त्यांचा परिणाम यांचा संबंध विसरता येत नाही. सध्या आपण झाड असे तर त्याची फळे कशी याचे आश्चर्य व्यक्त करत या साऱ्या घटना विसरण्याचा प्रयत्नात असतो. इतर साऱ्या गोष्टी तशाच ठेऊन फक्त या आघाडीवर काहीतरी सकारात्मक ठरावे अशी अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*