BLOG | ही राजकीय आणि सामाजिक विकृती..!

हजारो वर्षापासून लढाईत जिंकलेल्या लोकांनी पराभूतांच्या पुरुषांची मुंडकी उडवायची आणि स्त्रियांवर बलात्कार करायचे. किरकोळ अपवाद सोडला तर ज्यांना आपापल्या प्रांतात शूर,आदर्श,मसीहा मानल जात अश्या बहुतांशी राज्यकर्त्यांच्या राजवटी याच इतिहासाच्या आहेत. या पुरुषी मानसिकतेला कुठलाही खंड, कुठलाही देश-वंश-धर्म-जात अपवाद नाहीत.

लेखक : आनंद शितोळे, अहमदनगर

किरकोळ अपवाद असणारे राजेच फक्त लोकराजे,रयतेचे राजे होऊन गेले.

या स्त्रियांची विटंबना करण्याच समर्थन करणारी प्रवृत्ती आजही आहे.

बलात्काराच्या गुन्ह्याला फक्त फौजदारी गुन्हा म्हणून पाहण हि चूक आहे.
हि राजकीय आणि सामाजिक विकृती आधी आहे मग फौजदारी.

राजकीय पातळीवर तीच समर्थन केल जात, सामाजिक पातळीवर माणस तात्पुरती खवळून उठतात आणि परत जैसे थे होतात हेच फौजदारी गुन्हे वाढण्याच कारण आहे.
याला पायबंद घालायला राजकीय पातळीवर हि मानसिकता निखंदून टाकायला अश्या स्वरूपाच वक्तव्य करणारी व्यक्ती मग ती इतिहासात असो किंवा वर्तमानात असो, ती निषेधार्ह आणि बहिष्कृत असायला हवी.त्यामध्ये जात,धर्म,पंथ,लिंग भेद नकोच.

सामाजिक पातळीवर आपल्या घरातून दुरुस्ती गरजेची आहे.

भाबडेपणा अजिबात नको.जगातली प्रत्येक स्त्री आई-बहिणछाप भाबडेपणा अतिशय घातक.

‘ नो मीन्स नो ‘ ‘ नाही, म्हणजे नाही ‘ हे घरातल्या प्रत्येक पुरुषाच्या मनावर इतरांनी ठसवल पाहिजे.संस्कार म्हणून जे काही म्हणतो त्यामध्ये हा अविभाज्य भाग असायला हवाय.
शरीरसंबंध हा केवळ दोन्हींच्या संमतीनेच फक्त शक्य आहे, कुणाच्याही एकाच्या नकाराचा अर्थ स्पष्टपणे नाही हाच असतो हे ठासून बिंबवल गेल पाहिजे.मग हे नात नवरा बायकोच असेल तरीही हेच लागू असायला पाहिजे.

स्त्री कडे बघण्याची नजर जेवढी जास्त पुरुषांची बदलेल तेवढ्या मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडणाऱ्या स्त्रियांच्या मदतीची शक्यता वाढेल.जेवढ्या जास्त स्त्रिया कामानिमित्त ,स्वावलंबी होऊन रस्त्यावर, समाजात खुलेपणाने वावरतील तेवढी स्त्रियांना एकजुटीची भावना मानसिक बळ देईल.

गुन्हा घडून गेल्यावर “ ठेचला पाहिजे, जाळला पाहिजे, गोळ्या घातल्या पाहिजेत “ हा संताप पश्चातबुद्धी झाली.कायद्याची कठोर आणि जलद अंमलबजावणी काही प्रमाणात अटकाव घालू शकेल पण खरे उपाय राजकीय आणि सामाजिकच.

हि भूमिका असला गुन्हा किंवा प्रकार घडला म्हणून मांडायची हाही मुद्दा नाही, मुळात सगळ्यांनी सातत्याने हि भूमिका मांडून मोकळेपणाने बोलल पाहिजे तरच मुद्दा ठसवला जाऊ शकतो.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*