हिमवादळाच्या तडाख्यात अमेरिका हैराण..!

न्यूयॉर्क :

अमेरिका देशातील कॅलिफोर्निया राज्यामध्ये रस्त्यांवर कित्येक इंच जाडीचा बर्फाचा थर जमा झाला असून वेगवान वाऱ्यांमुळे विमानसेवाही बंद ठेवावी लागली आहे. यामुळे येथील शेतकरी आणि डेअरी व्यवसाय यांना मोठा फटका बसत आहे.

हिमवृष्टी, वेगवान वारे आणि पावसासोबत दाखल झालेल्या चक्रीवादळामुळे येथील जनजीवन पूर्णपणे कोलमडले आहे. ५५ दशलक्ष अमेरिकन नागरिकांना याचा फटका बसला आहे. येथील शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.

सर्व महामार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. डेनव्हर येथील उड्डाणे रद्द करण्यात आल्याने हजारो प्रवाशांना विमानतळावरच थांबावे लागले आहे. दरम्यान, गुगलने अमेरिकेत सुटीच्या या काळात पर्यटनासाठी हवामान कुठे योग्य आहे याची माहिती पुरविण्यास प्रारंभ केला आहे. कुठले स्थान आरामदायी तसेच सुरक्षित आहे याची माहिती उपलब्ध केली जात आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*