म्हणून मोदींची ऑफर पवारांनी नाकारली..!

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एका मुलाखती दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या ऑफरविषयी सांगितले आहे. सत्तास्थापनेपूर्वी झालेल्या एका भेटीत मोदींनी सत्ता स्थापनेकरिता एकत्र येण्याचा प्रस्ताव समोर ठेवला पण मी त्याला नकार दिला असे पवारांनी सांगितले. राज्यात असलेल्या दुष्काळासंबंधित चर्चेसाठी वेळ मागितली होती. त्यांनतर झालेल्या भेटीत त्यांनी ही ऑफर दिली. राजकीय चर्चा व्हावी याच हेतूने त्यांनी वेळ दिली असावी. याचवेळी पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद देण्याची तयारी त्यांनी दाखवली होती असे पवार यांनी सांगितले. ज्या मार्गाने जायचे नाही त्याची माहितीच कशाला घ्यायची असे म्हणत पवारांनी मोदींच्या ऑफरला स्पष्ट नकार दिला होता.
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*