मुंडे व खडसे पडले नाहीत, तर पाडले; एकनाथराव यांचा आरोप

जळगाव : माजी मंत्री पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी कन्या रोहिणी खडसे यांच्या पराभव झालेला नाही तर त्यांना जाणीवपूर्वक पडले गेले आहे असा आरोप भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी लावला आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेत पक्षाच्या उमेद्वाराविरुद्ध कारवाया केल्या गेल्या. कटकारस्थान करून पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पाडण्यात आले असा आरोप खडसे यांनी केला. या उद्योगांमध्ये ज्यांचा हात आहे त्यांची नावे पक्षश्रेष्ठींनी कळवली आहेत. आता आम्ही फक्त कार्यवाहीची वाट बघत आहोत असेही खडसे यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षांपासून खडसे हे पक्षात नाराज आहेत. आताच्या विधानसभेला तर त्यांची उमेदवारी डावलण्यात आली त्यामुळे त्यांची नाराजी अजूनच वाढली आहे.
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*