बाजार समितीच्या वसुलीसाठी कार्यालयाला सील..!

अहमदनगर :
जामखेडच्या नगरपरिषदेचा तब्बल 17 लाख 35 हजार रुपयांचा कर थकविल्याने नगरपरीषदेच्या अधिकाऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयाला सील ठोकल्याचे समोर आले आहे.

2016 नंतर कुठल्याही प्रकारचा कर बाजार समितीने भरलेला नाही. वसुलीसंदर्भात वेळोवेळी बाजार समितीच्या पत्र पाठवून कळवण्यात आले होते. पण त्यांनी कायमच या पत्रांकडे दुर्लक्ष केल्याचे लक्षात येताच कर अधिकारी आपल्या ताफ्यासोबत बाजार समिती कार्यालयवर पोहोचले. यावेळी बाजार समितीने दोन लाख रुपये देण्याची तयारी दाखवली परंतु ही मागणी धुडकावून लावत अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने सील ठोकलेच. माजी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या ताब्यात कृषी उत्पन्न बाजार समिती आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*