राजू शेट्टींनाच कृषिमंत्री करा; ‘स्वाभिमानी’ची मागणी

मुंबई :
मागच्या सरकारमध्ये शेतकरी हिताच्या विरोधात निर्णय घेतले गेले तेव्हा पहिल्यांदा स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेतून बाहेर पडली. माजी खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये लोकहिताचे निर्णय घेतले जात नाहीत असं म्हणत सत्तेला लाथ मारली आणि लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी दोन्ही काँग्रेसच्या आघाडीला साथ दिली. आता त्यांची सत्ता आल्याने कॅबिनेट कृषी मंत्रिपद राजू शेट्टी यांनाच द्यावे, असा ठराव सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला.

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर शेट्टी यांनी गेल्या २५ वर्षांपासून प्रचंड आंदोलने, मोर्चे काढून न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे त्यामुळे त्यांना कृषी खाते देऊन न्याय द्यावा अशी मागणी करण्याचे या बैठकीत ठरले. जिल्हाध्यक्ष महमूद पटेल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*