म्हणून जीएसटी वाढणार आणि महागाईसुद्धा..!

मुंबई :

नोटाबंदी आणि जीएसटी यांच्या फेऱ्यात भारताची अर्थव्यवस्था अडकली आहे. त्यातच मॉब लीन्चींग आणि धार्मिक तेढ वाढत असल्याने परकीय गुंतवणूक वाढण्याची शक्यता मावळत आहे. त्याच फेऱ्यामुळे आता राज्यांना जीएसटी नुकसान भरपाईसाठी थेट करावर अधिभार लावण्याची तयारी केली आहे. त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, तसे झाल्यास देशात महागाई वाढणार आहे.

एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंतचे जीएसटी संकलन समाधानकारक नाही. परिणामी राज्यांना नुकसान भरपाईसाठीची रक्कम केंद्र सरकारने दोन महिन्यांपासून दिलेली नाही. जीएसटी प्रणाली सुरू करताना राज्यांच्या कर संकलनात जर तूट असेल, तर काही प्रमाणात नुकसान भरपाई देण्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केलेले होते. मात्र, आता कराचे संकलन घटल्याने केंद्र ही रक्कम परत देऊ शकलेले नाही. अशावेळी होत असलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत अधिभार वाढविण्याच्या शक्‍यतेवर विचार केला जाणार असल्याचे समजते.

करावरील अधिभार वाढला की आपोआपच कराचे रेट वाढतील. कर वाढला की वस्तूंच्या किमती वाढतील. त्यामुळे या कराच्या फेऱ्यात आता अवघा देश महागाईयुक्त होण्याची भीती व्यक्त होत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*