म्हणून ‘वाघा’सारखी जनावरे काहीही बरळतात : मुंडे

पुणे :

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर आरे आणि आरक्षण आंदोलनातील आरोपींवरील गुन्हे मागे घेण्यात आलेली आहेत. त्यावर टीका करताना भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी टीका केली. त्यावर उत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी वाघांना जनावर म्हणून टीका केली आहे.

वाघ यांनी म्हटले होते की, “नशीब… कसाबला फाशी झाली नाहीतर त्याच्यावरचे गुन्हेही या महाराष्ट्र सरकारने कदाचित मागे घेतले असते….”

त्याला प्रत्युत्तर देताना मुंडे यांनी म्हटले आहे की, “सत्ता गेल्याचं पचत नाही म्हणून ‘वाघा’सारखी जनावरं काहीही बरळत सुटली आहेत.आपल्या हक्कासाठी झटणाऱ्या आंदोलनकर्त्यांची तुलना दहशतवाद्यांशी करताना यांना लाजा वाटत नाही का?भाजपच्या नेतृत्वाने या वाचाळवीराच्या नीच वक्तव्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेची ताबडतोब माफी मागावी.”

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*