खडसे-महाजन यांच्यातील नाट्य जळगावसह राज्यात चर्चेत..!

जळगाव :

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर भाजपमध्ये सर्वाधिक प्रभावी नेता म्हणून एकनाथ खडसे यांची ओळख होती. मात्र, राज्यात २०१४ मध्ये भाजप सत्ताधीश झाल्यावर केंद्रीय भाजप कार्यकारिणीने खडसे यांना बाजूला ठेऊन राजकारण सुरू केले. नंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांच्याविरुद्ध गिरीश महाजन यांना ताकद दिली. आता हेच खडसे ओ महाजन यांच्यातील वाद राज्यभर चर्चेत आलेला आहे.

विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदावर दावा करू शकणारे भाजपचे पहिल्या फळीतील सर्व नेते आश्चर्यकारक पद्धतीने पराभूत झाले. एकनाथ खडसे यांना तर तिकीटही नाकारले. तसेच त्यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघातून रोहिणी खडसे यांचाही पराभव झाला. परळी मतदारसंघात माजी मंत्री पंकाजाताई मुंडे यांचाही असाच धक्कादायक पराभव झाला. त्या सर्व पराभवाची कारणे भाजपमधील एका गटाने केलेल्या राजकीय डावपेचात असल्याचा आरोप करीत एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर नाव न घेता निशाना साधला आहे. त्यानेच व्यथित झालेल्या माजी मंत्री महाजन यांनी आता थेट खडसे यांनाच आव्हान देण्यास सुरुवात केली आहे.

आपणाकडे सर्व पुरावे आहेत आणि नावानिशी आहेत. प्रदेशाध्यक्षांच्या परवानगीने ते सर्वांसमोर मांडणार असल्याचे खडसे यांनी सांगितले आहे. त्यावर बोलताना माहाजन म्हणाले आहेत की, विरोधकांना कोणी मदत केली? त्याचे नाव व पुरावे थेट जाहीरच करावे. सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. पाडापाडीचे उद्योग आम्ही किंवा पक्षातील कुणीच करत नाही. दरवेळी चंद्रकांत पाटील हेच त्यांना लढत देतात. तिथे अटीतटीचा सामनाच होतो. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीनही पक्ष यंदा तिथे एकत्र आले होते. त्यामुळेच येथे भाजपचा १५00-२000 मतांचा फरक पडला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*