ग्रामपंचायत निवडणूक प्रभागरचना कार्यक्रम जाहीर; असे आहे वेळापत्रक

अहमदनगर :

राज्‍य निवडणूक आयोगाने माहे जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत सुंपणा-या व नव्‍याने स्‍थापित  ग्रामपंचायतीच्‍या  सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण  कार्यक्रम जाहीर झाला आहे.

नव्‍याने स्‍थापित  ग्रामपंचायतीच्‍या  सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रभाग रचना  तयार करणे 

दिनांक 20 डिसेंबर 2019 रोजी तहसीलदार यांनी गुगलमॅपवर MRSAC चे  नकाशे  अंतिम करणे. दि. 30 डिसेंबर 2019 रोजी  संबधीत  तलाठी व ग्रामसेवक यांनी संयूक्‍त  स्‍थळपाहणी करुन प्रभाग पाडणे, सीमा,व अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण  निश्चित करणे. दि. 10 जानेवारी 2020 रोजी  तहसीलदार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संमितीने प्रारुप प्रभाग रचनेला मान्‍यता देणे. दि. 20 जानेवारी 2020 रोजी  जिल्‍हाधिकारी कार्यालयामार्फत  नमुना ब प्रसिध्‍द करण्‍यापूर्वी तहसील कार्यालयाकडून प्रस्‍ताव प्राप्‍त करुन त्‍यांची संक्षिप्‍त  प्राथमिक  तपासणी करणे व त्‍यात  आवश्‍यक असल्‍यास दुरुस्‍त्‍या करणे. दि. 30 जानेवारी 2020 या दुरुस्‍त्‍या अंतर्भूत  करुन प्रारुप प्रभाग रचना व आरक्षणाला  तहसीलदार यांच्‍या  अध्‍यक्षतेखाली समितीने मान्‍यता देणे. दि. 1 फेब्रुवारी 2020 रोजी  विशेष ग्रामसभेची सूचना देणे व दि. 4 फेब्रुवारी 2020 रोजी  विशेष  ग्रामसभा बोलवून तहसीलदार यांनी प्राधिकृत  केलेल्‍या  अधिका-यांच्‍या  अध्‍यक्षतेखाली  प्रारुप प्रभाग रचनेवर  आरक्षणाची सोडत काढणे. .

प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविणे 

दिनांक 7 फेब्रुवारी 2019 रोजी  प्रारुप  प्रभाग रचनेला (नमुना ब) प्रसिध्‍दी देऊन तहसीलदार यांनी  हरकती व सूचना मागविण्‍यासाठी जाहीर सूचना प्रसिध्‍द करणे. दिनांक 14 फेब्रुवारी 2020 रोजी  प्रारुप प्रभाग रचनेवर  हरकती सादर करणे  दिनांक 20  फेब्रुवारी 2020 रोजी  प्राप्‍त झालेलया  सर्व हरकती व सूचनांवर उपविभागीय अधिकारी यांनी  सूनावणी  घेणे. दिनांक 29 फेब्रुवारी 2020 रोजी   प्राप्‍त झालेल्‍या सर्व हरकती व सूचनांवर सुनावणी घेणे व  दि. 11 मार्च 2020 रोजी आलेल्‍या प्रत्‍येक हरकती व सुचनांवर सुनावणीनंतर अभिप्रायासह अंतिम निर्णयासाठी  प्रस्‍ताव जिल्‍हाधिकारी  यांच्‍याकडे सादर करणे..

प्रभाग रचना अंतिम करणे 

दिनांक 17 मार्च 2019 रोजी उपविभागीय अधिकारी यांच्‍याकडून प्राप्‍त झालेले  प्रस्‍ताव  तपासून जिल्‍हाधिकारी यांनी प्रभाग व रचना व आरक्षणाला अंतिम मानयता देणे. दिनांक 21 मार्च 2020  जिल्‍हाधिकारी यांनी मान्‍य केलेल्‍या अंतिम प्रभाग रचनेला प्रसिध्‍दी देणे असा कार्यक्रम जाहीर झालेला आहे असे  जिल्‍हाधिकारी अहमदनगर यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे. 

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*