पहा हे आहे एमपीएससी २०२० चे वेळापत्रक

अहमदनगर :

महाराष्ट्र शासनाच्‍या मागणीनुसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता लोकसेवा आयोगामार्फत वर्षेभर विविध परिक्षांचे आयोजन करण्यात येत असून सन 2020 या वर्षामधील स्पर्धा परिक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे.

राज्य सेवा पूर्व परिक्षा 5 एप्रिल 2020 मुख्य परिक्षा 8,9 व 10 ऑगस्ट 2020,  दिवाणी न्यायाधिक कनिष्ठस्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परिक्षा 1 मार्च 2020 मुख्य परिक्षा 14 जून 2020, सहायक मोटार वाहन निरिक्षक पूर्व परिक्षा 15 मार्च 2020 मुख्य परिक्षा 12 जुलै 2020, महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परिक्षा रविवार 3 मे 2020 मुख्य परिक्षा संयुक्त 6 सप्टेंबर 2020, पोलीस उप निरीक्षक 13 सप्टेंबर 2020, राज्य कर निरीक्षक 27 सप्टेंबर 2020, सहाय्यक कक्ष अधिकारी 4 ऑक्टोंबर 2020, महाराष्ट्र वन सेवा  पूर्व परिक्षा 10 मे 2020, मुख्य परिक्षा 11 ऑक्टोबर 2020,  महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परिक्षा 17 मे 2020, मुख्य परिक्षा संयुक्त 18 ऑक्‍टोबर 2020,महाराष्‍ट्र गट- क सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षा 7 जून 2020 मुख्‍य परीक्षा 29 नोव्‍हेंबर 2019  लिपिक-टंकलेखक 6 डिसेंबर 2020, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क 13 डिसेंबर 2020, कर सहाय्यक 20 डिसेंबर 2020, महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व  परीक्षा 5 जुलै 2020 मुख्य परिक्षा 1 नोव्हेंबर 2020, सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षा 28 नोव्हेंबर 2020 रोजी होईल.

शासनाकडून संबधित संवर्ग/ पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल, या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे.  शासनाकडून विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये पदे विज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परिक्षा घेणे शक्य होईल, वेळापत्रक अंदाजित असून जाहितीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना/दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होवू शकतो, असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.  अंदाजित वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी माहिती वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.  संबंधित परिक्षेची परिक्षा योजना, अभ्यासक्रम, निवड पध्दत इत्यादी तपशिल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.  संबंधित परिक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशिल जाहिरात/अधिसूचनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल, असे सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी कळविले आहे.  

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*