टांग भरून पळालेल्या नित्यानंद बाबाने बनविला नवा ‘कैलासा’ देश..!

दिल्ली :

अध्यात्मिक गुरू म्हणून भारतीयांमध्ये लोकप्रिय असलेल्या स्वामी नित्यानंद बाबाने भारतातून पळून जाऊन थेट स्वतःचा कैलासा नावाचा देश स्थापन करण्याचा पराक्रम केला आहे. मुला-मुलींवर आणि महिलांवर अत्याचार करण्याच्या आरोपाखाली अटक होण्याच्या भीतीने नित्यानंद पळून गेलेला आहे.

मीच शिवाचा अंश असल्याने मला कोणीही पकडू शकत नसल्याचा दावा हा नित्यानंद बाबा भारतात असताना जगजाहीरपणे करीत होता. महिलांवर अत्याचार करण्याचा आरोप असतानाही पोलीस यंत्रणा या बाबाला हात लावू शकत नव्हती. बाबाचे भक्त पोलिसांनी अटक करू नये यासाठी प्रयत्न करतानाच सर्व तयारीनिशी विरोध करण्याची भाषा करीत होते. असे असतानाही केंद्र सरकारने किंवा पोलीस यंत्रणांनी या बाबाचा पासपोर्ट ताब्यात घेतला नाही किंवा कारवाई केली नाही. अखेर बाबाने पळून जाऊन आपलाच देश स्थापन केल्याची घोषणा केल्यावर जग आलेल्या परराष्ट्र मंत्रालयाने बाबाचा पासपोर्ट रद्द केला आहे.

मात्र, त्यावर कडी करीत बाबाने थेट कैलासा देशातर्फे पासपोर्ट देण्यास सुरुवात केली आहे. इक्वेडोर देशाच्या सागरी हद्दीत असलेले एक मोठे समुद्री बेट विकत घेऊन बाबाने त्या ठिकाणी हा नवा हिंदू देश स्थापन केला आहे. फ़क़्त हिंदू धार्मिक लोकांसाठी हा देश खुला आहे. तिथे नागरिकत्व मिळण्यासाठी कैलासा या देशाच्या वेबसाईटवर अर्ज करण्याचे आवाहन बाबा नित्यानंद याने केलेले आहे. विविध विभागात अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करतानाच थेट पंतप्रधान आणि मंत्रीमंडळ बनवून या बाबाने या नव्या देशाचे संविधान आणि झेंडा असल्याचाही दावा करून देत खळबळ उडवून दिली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*