आसामी जनतेला मोदींची साद; पण तरीही आसाम ट्विट ट्रेंडमध्ये..!

दिल्ली :

नागरिकता संशोधन विधेयक राज्यसभा आणि लोकसभेत मोठ्या बहुमताने मंजूर झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी देशाचे आभार मानले आहेत. मात्र, आता त्याच विधेयकाच्या विरोधात आसाम राज्यासह ईशान्येकडील राज्ये रस्त्यांवर उतरले आहेत.

अशावेळी सर्वांनी शांत राहण्याचे आणि कोणावरही अन्याय न होण्याचे आश्वासक ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. मात्र, त्याचवेळी या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यासह येथील आंदोलन कोणत्याही वृत्तवाहिन्यानी न दाखविण्याचे आवाहन करणारे पत्र सूचना मंत्रालयाने जारी केल्याचेही आता ट्रेंडमध्ये आहे. देशभरातून इंटरनेट सेवा बंद करण्याचा निषेध होत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*