‘त्या’ फोनवर नाही दिसणार जानेवारीपासून व्हाटस्अॅप..!

व्हाटस्अॅप नावाच्या विद्यापीठात शिक्षण घेत सामाजिक व राजकीय विषयासह इतिहासावर अधिकारवाणीने व्यक्त होणाऱ्या काही मंडळींना आता जानेवारी महिन्यापासून या विद्यापीठाच्या क्लासरूममध्ये बसता येणार नाही. कारण, काही मोबाईलवर यापुढे हे ज्ञानदान करणारे व्हाटस्अॅप दिसणार नाही. त्यासाठी त्यांना नव्याने अडमिशन घेऊन नवा मोबाइल खरेदीसाठी खर्च करावा लागणार आहे..!

जानेवारी महिन्याच्या ३१ तारखेपासून Android 2.3.7 या ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या मोबाइलवर व्हाटस्अॅप दिसणार नाही. ही ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या सर्व मोबाईलवर ही सेवा बंद झाल्याने आता त्या सर्वांना पुढील दीड महिन्यात नवीन मोबाइल खरेदी करण्यासाठी खर्च करावा लागणार आहे.

अॅपल कंपनीच्या आय फोनवरील iOS 8 यापेक्षा जुनी ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या फोनवरही १ फेब्रुवारी २०१९ पासून व्हाटस्अॅप चालणार नाही. त्यांनाही नवीन फोन घेण्याची तसदी घ्यावी लागणार आहे. एकूणच कंपनीच्या या निर्णयामुळे अनेक मोबाइल कंपन्यांची चांदी होणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*