स्टे कनेक्टेड विथ ‘युअर फोन’ & पीसी..!

दिल्ली :

जगातील ग्राहकांना आकर्षित ठेवण्यासह नव्या तंत्रज्ञानाने नवे ग्राहक जोडण्यासाठी आता मायक्रोसॉफ्ट कंपनीने फोन आणि मोबाइल यांना एकाच कामासाठी वापरण्याची नवीन सोय उपलब्ध करून दिली आहे. ‘युअर फोन’ या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून आता विंडोज १० असलेल्या सर्व पीसीवर (घरगुती / ऑफिसचा संगणक आणि लॅपटॉप) वापरून फोन करण्याचा आनंद घेता येणार आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनीने हे नवीन अॅप्लिकेशन आणण्यासाठीची तयारी पूर्ण केली आहे. कंपनीच्या वर्तुळात याचे प्रयोग यशस्वी झालेले आहेत. त्यानुसार आता ही सेवा ग्राहकांसाठी खुली होत आहे. ही बातमी वाचून अनेकांनी आताच हे अॅप्लिकेशन डाउनलोड करून घेत वापरण्याची तयारी ठेवली आहे. मात्र, त्यामध्ये अडचणी येत असल्याचे दिसते. त्याच्या अनेक तक्रारी गुगलवर केलेल्या ऑनलाईनला दिसत आहेत. मात्र, फोन करणे, स्वीकारणे असा वापर करून काम करताना फोनची होणारी अडचण कमी होणार की आणखी वाढणार हे काळ ठरवेल. मात्र, ज्यांना फ़क़्त कॉलिंग करायची आहे त्यांच्यासाठी ही सेवा मोठा आधार ठरेल असेच चित्र आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*