कडकनाथवाल्यांचा दुपारी मंत्रालयावर मोर्चा..!

मुंबई :

महारयत अ‍ॅग्रो कंपनीने फसवणूक केलेल्या हजारो शेतकऱ्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. भाजपचे सरकार जाऊन आता महाविकास आघाडीचे सरकार येऊनही याप्रकरणी काहीच कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ आता कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीतर्फे शुक्रवारी (दि. १४ डिसेंबर २०१९) दुपारी १२ वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे.

सुमारे ५०० कोटी रुपयांच्या फसवणुकीचे हे प्रकरण आहे. बाजारात १५ रुपयांना मिळणारी कडकनाथ कोंबडीची अंडी थेट ६० रुपयांना घेण्याच्या अमिषाला बळी पडून या कंपनीने हजारो शेतकऱ्यांना गंडा घातला आहे. देशभरात सुमारे १३ कंपन्या कडकनाथ कोंबडी पालनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांचा आहे. आता याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार काय कार्यवाही करणार याकडे अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली येथील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*