दिवसाआड वीजपुरवठा, पिके धोक्यात

अहमदनगर :

अहमदनगर जिल्ह्यात बहुतांशी खेड्यात विस्कळीत, अपुरा वीजपुरवठा हओत असल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी तर दिवसाआड वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नसल्यामुळे पिके धोक्यात आहेत.

कधी डीपी वर लोड जास्त होतो, फ्युज जळते आणि सध्या दिवसाआड वीजपुरवठा होत असल्याने पिकांना पुरेसे पाणी देने शक्य होत नाही. पारनेर तालुक्यात सुपा नजीक गावामध्ये सध्या ही परिस्थिती सर्वत्र दिसून येते.

एक विहिरीवर किंवा एका बोअरवेलवर शेतकरी ठरलेल्या पाळीने पाणी देत असतात. पण दिवसाआड वीज मिळत असल्याने पिकांना पाणी मिळत नाही त्यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आणि इतर पिकांचे नुकसान होत आहे. पाळीनुसार एखाद्याचा नंबर आठवड्यातून एकदा असेल तर वीजपुरवठा तुटवड्यामुळे तो शेतकरी थेट दोन आठवड्यातून एकदा पाणी देऊ शकतो. ही परिस्थिती अजुन महिनाभर जरी राहिली पिके पाण्याअभावी जळून जातील.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*