लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीचा खुलासा करा; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

नवी दिल्ली :

यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतमोजणी आणि मतदान यामध्ये फारकत असल्याचे अनेक लोकांनी समोर आले. यासंदर्भात माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून सवाल विचारले गेले पण निवडणूक आयोगाने उडवाउडवीची उत्तरे दिली.

या मतमोजणी आणि झालेले मतदान यामध्ये विसंगती आढळल्याने दोन स्वयंसेवी संस्थांनी याचिका दाखल केली. य पार्श्वभूमीवर 2019 लोकसभा निवडणुकांच्या मतदान आणि मतमोजणीचा खुलासा करावा याशी नोटीस सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला जारी केली आहे. सदर याचिकांची सुनावणी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखाली होईल. फेब्रुवारीमध्ये ही सुनावणी होईल असे खंडपीठाने ठरवले आहे.

लोकसभा निवडणूक पार पडल्यावर पुण्यात आय टी क्षेत्रात काम करणाऱ्या एका युवकाने माहिती अधिकाराच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला आकडेवारी मागितल्यावर यासंदर्भात आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही असे उत्तर आले. जर माहिती उपलब्ध नाही तर मग उमेदवार खासदार कसे झाले? असा प्रश्न उपस्थित होतो. निवडणूक आयोगाने दिलेल्या विचित्र उत्तरामुळे निवडणूक आयोगाच्या नैतिकतेवर प्रश्न असल्याची चर्चा लोकांमध्ये आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*