औरंगाबाद भाजपचा सेनेला स्पष्ट मेसेज; तिरंगी लढत निश्चित

औरंगाबाद :

राज्याच्या केंद्रस्थानी असूनही राजकीय व सामाजिकदृष्ट्या तुलनेने मागे असलेल्या औरंगाबाद शहराने आता आर्थिकदृष्ट्या आपले स्थान बळकट करण्यास सुरुवात केली आहे. मराठवाड्याच्या या राजधानीत त्यामुळेच आता खऱ्या अर्थाने राजकीय वातावरण तप्त झालेले आहे. भाजपने शिवसेनेला स्पष्ट मेसेज देत ऐन थंडीत येथील वातावरण तापवले आहे.

औरंगाबाद म्हणजे सेनेचा बालेकिल्ला. असाच समज मागील पंचवीस-तीस वर्षे कायम आहे. मात्र, आता राज्यासह देशात सेना-भाजप यांच्यात पडलेली उभी फूट औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या केंद्रस्थानी आली आहे. मार्च-एप्रिल 2020 मध्ये होत असलेल्या या निवडणुकीत भाजप स्वतंत्र लढणार असल्याचा स्पष्ट संदेश देण्यासाठी शहर भाजपने उपमहापौर पदासह सत्तेतून काढता पाय घेतला आहे. अशावेळी या महानगराची सत्ता ताब्यात घेण्यासाठी भाजप स्वबळावर लढणार हे निश्चित झालेले आहे.

भाजप स्वबळावर लढणार असल्यास शिवसेना आणि महाविकास आघाडी (सेना-राष्ट्रवादी-काँग्रेस) हे एकत्र लढू शकतात. तर, वंचितपासून वेगळे झालेला एमआयएम स्थानिक पक्षांची मोट बांधून या रिंगणात उतरू शकतो. अशा पध्दतीने येथे तिरंगी नाही तर बहुसंख्य प्रभागात चौरंगी लढत होण्याची चिन्हे आताच दिसायला लागली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*