म्हणजे घोटाळा नाही : देवेंद्र फडणवीस

नागपूर : 

एखादे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र 12 महिन्यांच्या आत सादर करायचे असते. काम योग्यरित्या पूर्ण झाल्याचं हे प्रमाणपत्र असतं. मात्र, 2018 पर्यंतच्या कालावधीत 65 हजार 921 कोटी रुपयांच्या कामाची 32 हजार 570 उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करण्यात आलेली नाहीत. परंतु, उपयोगिता प्रमाणपत्रे सादर न करणे म्हणजे घोटाळा नाही, अशी माहिती विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात दिली.

काल दि. 21 डिसेंबर रोजी विधानसभेमध्ये कॅगचा अहवाल सादर झाल्यानंतर  राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी उपयोगिता प्रमाणपत्र सादर न केल्याने 2018 पर्यंतच्या कालावधीत 65 हजार 921 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला होता तसेच विविध वृत्तपत्र आणि माध्यमांकडून करण्यात आलेल्या वृत्तांकनातूनही असेच पडसाद उमटले असल्याने याबाबत त्यांनी वस्तु व सेवा कर विधेयकावर आपले मत मांडतांना वरील स्पष्टीकरण केले.  

ते पुढे म्हणाले की, उपयोगिता प्रमाणपत्र सादर न करणे म्हणजे घोटाळा होतो का? तसे असेल तर  काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात मोठे घोटाळे झाले असे म्हणावे लागेल. 31 मार्च 2009 मध्ये एकूण 1 लाख 30 हजार 812 उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्यात आली नव्हती ज्याची एकूण किंमत 41 हजार 537 कोटी रुपये होती. 2010 मध्ये 53 हजार 539 कोटी रुपयांची 1 लाख 78 हजार 689 प्रमाणपत्रे तर 2011 मध्ये 73 हजार 198 कोटी रुपयांची एक लाख 83 हजार 963 प्रमाणपत्रे थकीत होती. 2012 मध्ये तर सर्वाधिक 1 लाख 95 हजार 718 प्रमाणपत्रे ज्यांची एकूण किंमत 88 हजार 240 कोटी रुपये होती, थकीत होते. याउलट आमच्या शासनाच्या काळात थकीत प्रमाणपत्रांची ही संख्या आम्ही सातत्याने कमी करत आणली होती असे मी नाही तर गेल्या चार वर्षांतील आकडेवारी आकडेवारी सांगते. मार्च 2015 ला 81 हजार 877 उपयोगिता प्रमाणपत्रे थकीत होती ज्यांची किंमत 61 हजार 148कोटी होती तसेच यांची संख्या नंतरच्या वर्षी कमी होत 56 हजार 107 झाली ज्यांची किंमत 63 हजार 89कोटी रुपये होती. 2017 मध्ये हीच संख्या 38 हजार 884 झाली तर 2018 मध्ये 32 हजार 570 एवढी झाली आहे. ज्यांची किंमत अनुक्रमे 60 हजार 321 कोटी आणि 65 हजार 621 कोटी रुपये एवढी आहे, असे असताना घोटाळा झाला असे आरोप करणे योग्य आहे का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*