कौशल्य विकासवृद्धीसाठी राज्य सरकारची अनोखी स्पर्धा..!

मुंबई :

पुढील वर्षी जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने राज्य व जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन मुंबई शहराच्या कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त यांनी केले आहे.

विविध क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने राज्यात कौशल्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेचे जिल्हा, विभाग, राज्य आणि देशपातळीवर निवड झालेल्या उमेदवारांची नावे जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत.

जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेचे आयोजन :

1.         जिल्हा पातळी स्पर्धा : 15 जानेवारी, 2020 ते 15 फेब्रुवारी, 2020

2.         राज्य विभागीय पातळी स्पर्धा : 15 फेब्रुवारी, 2020 ते 15 मार्च, 2020

3.         राज्य पातळी स्पर्धा : 15 मार्च, 2020 ते 31 मार्च, 2020

यानंतर देश विभागीय पातळी, देश पातळी आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

या  स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी, 1999 किंवा तद्‌नंतर असणे अनिवार्य आहे. तसेच एअरक्राफ्ट मेंटेनन्स, मेकाट्रॉनिक, इन्फॉरमेशन नेटवर्क केबलिंग, मॅन्युफॅक्चरिंग टीम चैलेंज, वॉटर टेक्नॉलॉजी, क्लाऊड कंप्युटिंग आणि सायबर सिक्युरिटी या क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 1996 किंवा तद्‌नंतर असणे अनिवार्य आहे.

शांघाई (चीन) येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा 2021 जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवरुन प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेकरिता सर्व ITI, Polytechnic Colleges, Technical High School, MCVC Bifocal, प्रत्येक युनिव्हर्सिटी अधिपत्याखालील सर्व अभियांत्रिकी, कला, वाणिज्य, शास्त्र शाखेची आणि इतर कनिष्ठ तसेच, महाविद्यालये, तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अधिनस्त सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांना या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता आवाहन करण्यात येत आहे.

त्यानुषंगाने या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता मुंबई शहर जिल्ह्यातून जास्तीत जास्त उमेदवारांनी नाव नोंदणी https://worldskillsindia.co.in/worldskill/index.php या संकेतस्थळावर दि. 15 जानेवारी, 2020 या अंतिम दिनांकापूर्वी ऑनलाईन रजिस्ट्रेशनद्वारे करण्यात यावी व जागतिक कौशल्य स्पर्धा 2021 मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहरद्वारे करण्यात आले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*