या आहेत CAA बद्दल मराठी अभिनेत्यांची भूमिका..!

मुंबई :

इथे देशातील विद्यार्थी असुरक्षित आहेत. त्यांच्यावर हल्ले होत आहेत आणि तुम्ही देशाबाहेरील अल्पसंख्याकांना सरंक्षण द्यायला निघालात, असे ट्विट करत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

अतुल कुलकर्णी, रेणुका शहाणे यांनी घेतलेल्या cab कायद्याच्या विरोधात भूमिका घेतल्या. यानंतर सोनालीने घेतलेल्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अररारा फेम अभिनेता प्रवीण तरडे यांनी पत्रकार राजू परुळेकर यांच्या एका पोस्टवर जाऊन सर्व देश भाजपसोबत आहे, अशी कमेंट केली. त्यानंतर त्यांना तरुणांच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले. तरडे हे संघाचे स्वयंसेवक असल्याने त्यांची ही भूमिका असावी. त्यानंतर ती कमेंट तरडे यांनी डिलीट केली अशी माहिती समोर मिळाली आहे. पण तरीही तरडेंच्या विरोधात कमेंटचा पाऊस चालूच आहे. हळूहळू बऱ्याच मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांच्या भूमिका समोर येतील अशा अंदाज आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*