‘फडणवीस यांनी आत्मचिंतनासाठी बाबांकडे जावं’

नागपूर :

पाच वर्षांत त्यांनी काय केलं याच आत्मचिंतन करावं आणि गरज पडल्यास रामदेवबाबा यांच्याकडे जावं असा सल्ला राज्याचे क्रीडामंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.

नागपुर मध्ये फडणवीस यांचे मताधिक्य कमी का झाले? हे त्यांना लक्षात येत नसल्यास त्यांनी सहा महिन्यांसाठी रामदेवबाबांकडे जावे आणि आत्मचिंतन करावे असेही ते म्हणाले.
नागपूर येथे जिल्हा परिषद निवडणूकी दरम्यान केदार हे मतदानासाठी त्यांच्या सावनेर मतदारसंघात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा खोचक सल्ला फडणवीस यांना दिला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*