सभेसाठी भाजप नेत्याने रोखला रुग्णवाहिकेचा रस्ता..!

कोलकाता :

काहीही असो रुग्णवाहिकेला प्रथम जाऊ देणे हे प्रत्येक भारतीय स्वतःचे कर्तव्य समजतो. एखादा सार्वजनिक आंदोलन असो वा कार्यक्रम रुग्णवाहिकेला तातडीने रस्ता मोकळा केला जातो. मात्र, पश्चिम बंगालमध्ये रुग्णवाहिकेचा रस्ता रोखल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

एका जनसभेसाठी एका भाजपा नेत्याने रुग्णवाहिकेचा रस्ता रोखल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णावाहिकेचा रस्ता रोखणार हा नेता दुसरा तिसरा कोणी नसून भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष हे आहेत. या घटनेचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. 

सदर सभेला प्रचंड गर्दी झाली होती. पश्चिम बंगालच्या नदियामध्ये ही सभा भरली होती. त्याचदरम्यान एक रुग्णवाहिका तेथून जात होती. मात्र जनसभेसाठी दिलीप घोष यांनी रुग्णवाहिकेचा रस्ता रोखला आणि दुसऱ्या रस्त्याने रुग्णवाहिका वळवण्यास सांगितली. या प्रकारानंतर समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांतून त्यांच्यावर टीका करण्यात आली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*