फडणवीसांना पायतानाने हाणायला पाहिजे : गोटे

मुंबई:
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामात भ्रष्टाचार केला आहे. शिवस्मारकाच्या कामात इतका घोळ केला आहे की उभ्या महाराष्ट्राने पायताणाने मारलं पाहिजे. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हजारो कोटींचे घोटाळे केले आणि या घोटाळ्यात शिवाजी महाराजांनाही सोडलं नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांनी केलं आहे.

मी अतिशय जबाबदारीने हे वक्तव्य करत आहे. मी याचे पुरावे सादर करू शकतो. मी पुराव्याशिवाय आणि कागदपत्राशिवाय कधीच बोलत नाही, असंही ते म्हणाले आहेत. जुने भाजपायी असलेले गोटे यांनी फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली. ते ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*