मराठी पुस्तके व इतर दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन

अहमदनगर :

चांगले ग्रंथ वाचकापर्यंत जाण्यासाठी ग्रंथप्रदर्शन भरविणे हा उपक्रम स्तुत्य असून या प्रदर्शनातील पुस्तकाचा लाभ युवकांनी व रसिक वाचकांनी घेतला पाहिजे.  त्यामुळे मराठी भाषेला चांगले दिवस येण्यास मदत होईल असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका प्राध्यापक मेघाताई काळे यांनी केले.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सावेडी अहमदनगर मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित साहित्य अकादमीचे मराठी ग्रंथाची व साहित्यविषयक पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित केले होते त्यांच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या ,मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी मराठीतील पुस्तके सर्व पर्यंत पोहोचली पाहिजे. .ही मराठी भाषेतील वृत्तपत्र ,ग्रंथ, नियतकालिके यांना चांगला  चांगला प्रतिसाद आहे त्याचे उत्तम उदाहरण आहे. तसेच  नुकतेच झालेले उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनात मराठी पुस्तकाची मोठी विक्रमी खरेदी झाली आहे तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकर मिळाला पाहिजे आसे ही त्या महणाले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे होते .त्यांनी  ग्रंथाची वाढ व ग्रंथालयाचा विकास झाला पाहिजे त्याचबरोबर वैज्ञानिक, शास्त्रीय ,संशोधनपर ग्रंथ मराठी भाषेतून प्रकाशित झाली पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  प्रमुख पाहुणे म्हणून लेखक शब्बीर शेख उपस्थित होते.  

स्वागत व प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर  यांनी केले. त्यानी  मराठी भाषेतील अनुवादित मराठी पुस्तके व इतर दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन दिनांक 13 जानेवारी ते 17 जानेवारी 2020 कार्यालयीन वेळेत सर्वासाठी विनामूल्य उपलब्ध आहे या मराठी विषयक ग्रंथाचा जास्तीत जास्त वाचकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन श्री गाडेकर यांनी केले.

सूत्रसंचालन तांत्रिक सहाय्यक हनुमान ढाकणे यांनी केले. या कार्यक्रमास शैलेश घेगडमल, शिवाजी परकाळे, राजू  परकाळे ,अमोल इथापे, संदीप नन्नवरे , प्रतीक्षा दगडखैर आदीसह बहुसंख्य वाचक उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*