प्रत्येक गावाला दर्जेदार रस्ता : मुश्रीफ

मुंबई :

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ग्रामीण भागात जवळपास २ लाख ३६ हजार रस्ते आहेत. या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. यापुढील काळात प्रत्येक गावाला जोडणारा रस्ता दर्जेदार असावा, ही आमची प्राथमिकता असेल. प्राथमिक शाळा तसेच आरोग्य केंद्रे यांना सुविधा उपलब्ध करुन देण्यावरही भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.    

सरपंचांच्या थेट निवडीबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, सरपंचांच्या थेट निवडीमुळे त्याचा विपरीत परिणाम दिसून आला आहे. सरपंच एका विचाराचे व सदस्य दुसऱ्या विचाराचे असे चित्र अनेक ग्रामपंचायतींमध्ये निर्माण झाले आहे. थेट निवडून आलेले सरपंच व सदस्य यांच्यामध्ये समन्वय राहिलेला नाही. याचा गावाच्या विकास कामावर परिणाम झाला आहे. आपल्या देशात अध्यक्षीय पद्धती नाही, तर मग गावात थेट सरपंच निवडीची पद्धती का ? असा प्रश्न मी उपस्थित केला होता, असे ते म्हणाले. त्यामुळे सरपंचांची थेट निवडीची पद्धती रद्द करुन सदस्यांमधून सरपंच निवडीच्या पद्धतीचे त्यांनी समर्थन केले.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, मुख्य परिचालन अधिकारी रवींद्र शिंदे उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*