कौशल्य वृद्धीसाठी सरकार प्रयत्नशील : मलिक

मुंबई :

कौशल्य विकास मंत्री श्री. नवाब मलिक म्हणाले की, राज्यात कुशल रोजगार निर्माण करण्यात कौशल्य विकास विभागाचे मोठे योगदान आहे. आयटीआयच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो तरुणांना रोजगार मिळाला आहे. दीर्घ मुदतीच्या अभ्यासक्रमात राज्यात इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, मेकॅनिक, वायरमन, टर्नर असे विविध अभ्यासक्रम चालविले जातात.

महिलांसाठीही ड्रेस मेकींग, फॅशन टेक्नॉलॉजी असे विविध अभ्यासक्रम आहेत. संगणकविषयकही अभ्यासक्रम आहेत. आता त्या त्या ठिकाणची उपलब्ध साधनसामुग्री, उद्योगांच्या बदलत्या गरजा, सेवा क्षेत्राची मागणी यानुसार नव्या अभ्यासक्रमांची आखणी केली जाईल. याशिवाय तयार असलेले कुशल कारागिर व उद्योगांना लागणारे कुशल कारागिर यांची सांगड घालून तरुणांना योग्य ठिकाणी नोकरी मिळण्यासाठीही विभागामार्फत कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कौशल्य विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*