Blog | सिटीझन Vs स्टेटचे प्रकरण आहे की हे..!

हा फक्त दोन व्यक्तींमधला वाद आहे असं कुणाला वाटत ? प्रकरण वरवर वाटत त्यापेक्षा जास्त गंभीर आहे.

खाजगी विमान कंपनीच्या विमानात घडलेल्या प्रकरणात त्या विमान कंपनीने प्रवास करायला नकार दिला.

मूळ प्रकरणात चौकशी होऊन कारवाई होईलच. मात्र बाकीच्या विमान कंपन्या सुओ मोटो पद्धतीने का कारवाई करत आहेत ?

त्या क्षणी तुमचा प्रवासी किंवा ग्राहक नसलेल्या ,तुमच्या कामकाजात हस्तक्षेप किंवा अडथळा न आणलेल्या माणसावर कारवाई करण्याचा अधिकार आहे का ?

एअर इंडिया अजूनही सरकारी आहे आणि माहिती अधिकाराचा कायदा लागू आहे, उद्या ही कारवाई का केली म्हणून विचारलं तर काय उत्तर देणार आहेत ?

दोन व्यक्ती मधलं प्रकरण असताना या घटनेला सरकार विरुद्ध एक माणूस हे स्वरूप का दिलं जातंय ?

सरकार धार्जिण्या इसमाचा इगो दुखावला म्हणून या प्रकरणात सरकार का लुडबुड करतय ?

सरकारचा कुठलाही संबंध नसताना भक्तगण अर्णब च्या बाजूने गळे का काढताहेत ?

या प्रकरणात इतर कंपन्यांनी भविष्यातील धोका अस तर्कशास्त्र लावलं तर मग हा घडलेला प्रकार इंडिगो ला बदनाम करायला इतर कंपन्यांनी रचलेला बनाव आहे असाही तर्क लावता येईलच की ?

मुळात कुणाल कामरा सरकारच्या विरोधात उपहास आणि विनोदाच्या माध्यमातून टीका करतो त्यामुळे सरकारचा राग आहे आणि ही मिळालेली संधी आहे.

आपल्या विरोधातल्या प्रत्येक माणसाला आपण कसे खिंडीत पकडून जेरीस आणू शकतो हे दाखवून सगळ्या सामान्य जनतेला एक प्रकारे धमकवण्याचा हा प्रकार आहे.

हा नागरिक विरुद्ध स्टेट अश्या थेट संघर्षाचा भाग आहे. हे समजून घेतल्यावर आपल्याला आपली भूमिका काय हे ठरवता येईल. बरोबर ना ?

लेखक : आनंद शितोळे, अहमदनगर

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*