दिल्लीत महाराष्ट्र भाजप डेरेदाखल; राष्ट्रवादीची बोचरी टीका

मुंबई :

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचे नेते व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सत्ता खालसा करण्यासाठी सध्या भाजपने जंग-जंग पछाडले आहेत. केंद्रीय नेतृत्वासह आता महाराष्ट्र व इतर राज्यातील नेतेही सध्या दिल्लीत तळ ठोकून आहेत. त्यावर बोचरी टीका करणारी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे.

ट्विटरवर फोटोसह पोस्ट टाकून राष्ट्रवादीने म्हटले आहे की, दिल्ली निवडणुकीचा @BJP4India ने प्रचंड धसका घेतला असून दिल्ली आता आपल्या हाती लागणार नाही असेच जणू त्यांना वाटत आहे. यामुळे भाजपाने आपल्या सभांची संख्या दुप्पट केली आहे, तर महाराष्ट्रातील @Dev_Fadnavis, @ChDadaPatil, @Pankajamunde यांच्यासारख्या नेत्यांची फौज दिल्लीला बोलवली आहे.

https://t.co/zJo3YoPFjW

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*