Blog | एका बातमीच मरण..!

लेखक : अनंत बर्गे (फेसबुक वॉलवरून साभार)

‘बस कंडक्टर IAS होणार’ ही बातमी मोस्ट व्हायरल ठरली. बंगळुरुमध्ये बस कंडक्टर असलेला मधू यूपीएससीच्या मुलाखतीकरिता पात्र ठरला होता. कामासोबत अभ्यास आणि कन्नडसह इंग्रजी साहित्याचा अभ्यास करुन मधूनं यश मिळवल्याच बातमीत म्हटल होत. बातमीत प्रचंड सकारात्मकता होती. नॕरेशन स्टाईल अप्रतिम होत.

कर्नाटकातील पत्रकार मित्राला फोन करुन मधूचा नंबर मिळवला. मधूशी बोलणही झालं. तुझं यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल अशा शुभेच्छाही दिल्या!!

मधूला मुलाखतीकरिता योग्य मार्गदर्शन मिळाव म्हणून IPS महेश भागवत सरांशी बोलाव असा विचार मनात आला. सरांना बातमी फॉरवर्ड केली. मात्र, सरांनी बातमी खोटी असल्याचे सांगितलं आणि मी क्षणभर हबकलोच.

कारण ‘नॕशनल टू लोकल’ माध्यमांनी मधूची बातमी चालवली होती. मी पुन्हा कर्नाटकच्या पत्रकार मित्राला फोन केला. त्याने बातमी खरी आहे आणि मधूने व्हिडिओ बाईट दिल्याचे सांगितले. देशभरातून मधूला मदतीचा ओघ सुरू आहे. नेमकं काय चित्र स्पष्ट होत नव्हतं.

मी महेश भागवत सरांच्या मेसेजवर ठाम राहिलो आणि मुलाखतीकरिता पात्र उमेदवारांची यादी तपासली. त्या यादीमध्ये मधूच्या नावाचा उल्लेखच नव्हता.

मधूने खोट का भासवल?? ‘मिररने’ तथ्ये पडताळून का पाहिले नाहीत?? असे प्रश्न निर्माण होतील.

आपल्या वाचकांची ‘मिरर’च्या संपादकांनी रीतसर माफी मागितली आहे. मधूने दिशाभूल केल्याचे म्हटले आहे. ‘मिररने’ बातमी मागे घेतली आहे.

सकारात्मक बातमीचा शेवट असा होईल वाटल नव्हतं.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*