तालुक्यातही असणार सीएम ऑफिस; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : 

महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवून कामे केली जात आहेत.  राज्याची अधिक प्रगती करतांना सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन राज्यासाठी विकासकामे करायला बांधील आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत सांगितले.

राज्यपालांच्या अभिभाषणांवर झालेल्या चर्चेला उत्तर देतांना मुख्यमंत्री बोलत होते.  ते म्हणाले की, विकासकामांच्या बाबतीत गती पकडली आहे. आम्ही विकासाचे मारेकरी नसून महाराष्ट्र प्रेमी आहोत.  विकासकामांचे प्राधान्यक्रम ठरवून त्याची अंमलबजावणी केली जात आहे.

राज्यातील गोरगरीब जनतेला मंत्रालयात लहान-सहान गोष्टीसाठी हेलपाटे मारावे लागू नये यासाठी मुख्यमंत्री कार्यालय विभागीय स्तरावर सुरु केले. आता त्याचा विस्तार तालुका पातळीपर्यंत करण्यासंदर्भात विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावर्षी महाराष्ट्राला 60 वर्षे पुर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशालाच नव्हे तर जगाला हेवा वाटावा असा हीरकमहोत्सव साजरा करू या, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.  महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची तीन दिवसांपूर्वी पहिली यादी जाहीर झाली.  पुढील एक-दोन दिवसात दुसरी यादी जाहीर करू.  मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. शेतकऱ्यांना योजनेविषयी समाधान वाटले. या योजनेमुळे रुग्णालयात दाखल असलेल्या 85 वर्षीय वृद्धेला कर्जमुक्तीचा लाभ मिळाला हे ऐकून आनंद वाटल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*