त्या मराठी बांधवांवरचा अन्याय सहन करणार नाही : मुख्यमंत्री

मुंबई :

कर्नाटकव्याप्त महाराष्ट्रामध्ये मराठी बांधवांवर भाषेचा अत्याचार आम्ही सहन करणार नाही.  राजकीय विचार बाजूला ठेवून तिथल्या मराठी मातेच्या पुत्रांसाठी एकजुटीने प्रयत्न करून या असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

महाराष्ट्रात महिला अत्याचाराबाबत कायदा जलदगतीने तयार केला जात आहे. विरोधकांनी उणीवा जरूर दाखवाव्यात मात्र राज्याच्या विकासासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाधील आहेत हे लक्षात ठेवावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शिवभोजन योजनेमुळे गरजूंसाठी सोय झाली आहे. सरकार यशाच्या दिशेने ठामपणे पाऊले टाकत आहे.  आदिवासी बांधवांच्या आणि दुर्बल घटकांच्या रक्षणासाठी शासन त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याचे वचन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. 

मराठी रंगभूमीची देशाला मोठी देणगी असून या रंगभूमीने समाजातील व्यथांवर भाष्य केले.  या रंगभूमीचा इतिहास सांगणारे दालन मुंबईत उभे करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*