नाईलाजाने कठोर निर्णय घ्यावा लागेल : मुख्यमंत्री

मुंबई :

कोरोना हा रोग संसर्गजन्य असल्याने गर्दीची ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. पुण्यात तर सगळीकडे शुकशुकाट आहे. मॉल्स, जिम, हॉटेल, कंपन्या इतर वस्तूंची दुकाने बंद ठेवली आहेत. अगदी बुधवार पेठेत सुद्धा फिरण्यास प्रतिबंध घातला आहे. त्यानंतरही जर काही ठिकाणी, कुठल्याही कारणामुळे गर्दी होत असेल तर मग नाईलाजाने कठोर निर्णय घ्यावा लागेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

कालपर्यंत राज्यामध्ये कोरोनाचे ४१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दुर्दैवाने एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. २६ पुरुष आणि १४ महिलांचा समावेश आहे. एक-दोन अपवाद सोडले असता सर्वांची प्रकृती ठणठणीत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही निर्बंध आणण्यासाठी काल बैठक घेतली होती.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*