अबबब, चक्क आरोग्यमंत्रीच करणार वर्क फ्रॉम होम..!

प्रसिद्ध गायिका कनिका कपूरने एक मोठ्ठी पार्टी ठेवली व्हती, आता एवडी मोट्टी गायिका म्हणल्याव शेलेब्रिटी बिलिब्रिटी येणारच की… तिथं पार्टीला आले ह्या एक से बढकर एक शेलेब्रिटी… आता कोरोनामुळं हितं-तिथं चारपेक्षा जास्त टाळक्यांनी जमायचं न्हायी ह्यो नियम चालू झालेला पण तरीबी हितं सतराशे साठ लोक जमलेली…आता झाला का मॅटर? म्हणजे तुम्हाला वाटलं असंल की आता धाड टाकली का काय पार्टीव पण तसं काही नसतय हो, कुणीतरी मोठा माणूस म्हणून गेलाय all people are equal but some are more equal…समजलं नसन तर जाऊद्या, मोक्कार डोक्याला शॉट लावून घेण्यापेक्षा स्टोरी ऐका… तर तिथं लै मोठे लोक जमलेले मंजी थेट माजी मुख्यमंत्री, त्यांचे कुटुंब, बाकी मंत्री सोबत अभिनेते असली सगळी गॅंग हुती त्याच्यामुळे कुणाला कार्यवाहीचं भ्या वाटलं नाही. त्यात मंत्री संत्रीची रिचवत असावेत म्हणून कनिका बाई का पार्टी देऊन राहिली हे ईचारायचं कष्ट कुणी घेतले नाहीत,तर आपले ईनु-टिनूनी शोध मोहीम हाती घेतली आणि सांगितले की कनिका बाई परदेशातून मायदेशी परतल्या होत्या म्हणून पार्टी ठुली व्हती, आता झाला का मनस्ताप… कनिका बाई बाहेरून आली म्हणजे तिची कोरोनाची टेस्ट व्हयला पाहिजे हुती पण बाईनी टेस्ट करायचे कष्ट घेतले नाहीत आणि पार्टी का दिली हे विचारायचे कष्ट खाणार्यांनी घेतले नाही … आता कनिका बाईला कोरोना झाल्याची बातमी लागल्यावर सगळ्यांचे धाबे दणाणले. त्या पार्टीला स्वतः उत्तरप्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रताप सिंग हे देखील हजर होते व त्यांनीही बाईंना कुठलीही विचारपूस केली नाही. त्यामुळे त्यांच्यावर देखील घरात बसून राहायची वेळ आलेली आहे.त्यामुळे आता चक्क आरोग्यमंत्री सुद्धा झक मारून work from home करणार आहेत कारण की दुसरा पर्यायच नाहीये…

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*