करोना विषाणू | जनता कर्फ्यू, दोन्ही बाजू

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे.

या जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर काल पूर्वसंध्येला पुण्यात दुधासाठी रांगा लागल्याचे चित्र दिसत होते तर कोल्हापूरमध्ये
चिकन-मटणच्या दुकानासमोर अक्षरशः रांगा लावल्या. परंतु एक ठिकाण असे आहे की तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात किंवा शहरात जा त्या ठिकाणी काल रात्री उशिरापर्यंत रांगा दिसतंच होत्या ते म्हणजे वाईन शॉप. जगभरात कितीही मंदी येवो, कुठलीही महामारी येवो वाईन शॉप्स समोर गर्दी दिसतेच…
यापलीकडे दुसरी बाजू आहे ती हातावर पोट असणाऱ्याची. दिवसभर काम केलं तरच खायला मिळतं असे अनेक लोक आपल्याला दिसतात. पुढील आठ-पंधरा दिवस हीच परिस्थिती राहिली तर उपासमारीची वेळ त्यांच्यावर येऊ शकते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*