Tax रिटर्न, Aadhaar-PAN लिंकपर्यंतच्या ‘डेडलाईन’ वाढविण्याची घोषणा

दिल्ली :

कोरोनामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. शेअर बाजार, खेळते भांडवल यावरही मोठा परिणाम दिसून आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची घोषणा केली आहे.

करदात्यांना त्यातून मोठा दिलासा देण्यात आला आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत अर्थमंत्र्यांनी वाढवली आहे. या महासाथीच्या संकटामुळे जगभरावर आर्थिक संकट ओढवलं आहे. भारतातही अनेक उद्योगांचं, व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे. त्यामुळे हे आर्थिक पॅकेज जाहीर करण्याविषयीची घोषणा त्यांनी केली आहे. संकटाच्या वेळी आर्थिक अडचण उद्भवू नयेत यासाठी घोषणा करत असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. आर्थिक वर्ष 2018-19 साठी इन्कम टॅक्स भरायची शेवटची मुदत 30 जून 2020 असेल अशीही माहिती यावेळी त्यांनी दिली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*