टाळ्या-थाळ्या सोडून दुसरं काहीतरी सांगा : अभिनेत्री पूजा बेदी

मुंबई :

आज रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासीयांना मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती त्यांनी ट्विट करून दिली. याच ट्विटला उत्तर देत अभिनेत्री पूजा बेदी हिने टीका केली आहे.

“आज रात्री आठ वाजता पंतप्रधान आपलं मार्गदर्शन करणार आहेत. मला आशा आहे, की यावेळी तरी ते टाळ्या आणि थाळ्या वाजवायच्या हे सोडून काहीतरी दुसरं सांगतील. लॉकडाउन प्रोटोकॉल, देशाची आर्थिक स्थिती, वैद्यकीय उपचार अशा विषयांना ते स्पर्श करतील, अशी अपेक्षा आहे असे उपरोधिक ट्विट पूजा बेदी हिने केले आहे. हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अभिनेत्री पूजा बेदी ही अनेक भुमिकांवर स्पष्ट मत मांडताना दिसते. यावेळी तिने थेट मोदींना लक्ष्य केले आहे.कोरोना या रोगाचा सामना करत असताना मोदी आज या विषयावर दुसऱ्यांदा देशाला संबोधित करणार आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*