धक्कादायक! चीनमध्ये नव्या व्हायरसचा शिरकाव; एकाचा मृत्यू

बीजिंग:

कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे जगाचे मोठे मानवी व आर्थिक नुकसान झाले आहे. हा व्हायरस चीनमधून आला होता. तिथे आता परिस्थिती नियंत्रणात येतच होती तोपर्यंत दुसऱ्या व्हायरसने शिरकाव केला आहे. व त्यामुळे एक मृत्यूही झाल्याची घटना समोर आली आहे.

कोरोनाने थैमान घातलेल्या युन्नान प्रांतामध्ये एका व्यक्तीचा सोमवारी नव्या व्हायरसमुळे मृत्यू झाला. कोरोना कमी झाल्यामुळे हा व्यक्ती शाडोंग प्रांतातून रोजगारासाठी बसने येत होता. या नव्या व्हायरसचे नाव हंता असून त्यांला या व्हायरसची लागण झाल्याचे उघड झाले. यामुळे त्यांच्यासोबत बसमध्ये प्रवास करत असलेल्या ३२ लोकांचीही तपासणी करण्यात आली आहे. आता चीनची झोप उडाली असून त्यांना कदाचित नव्या व्हायरसला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. याबाबत जागतिक स्तरावर बातम्या येत आहेत. अशावेळी पुढे काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तर, चीनने याबाबत नेहमीप्रमाणे अधिकृत वक्तव्य केलेले नाही.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*