पुण्याहून आलेला पाहुणा निघाला कोरोना संशयित

औरंगाबाद :

कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी लोक बेफिकीरपणे हिंडत आहेत. त्याचे गांभीर्य लोकांच्या लक्षात आले नसल्याचे अनेक घटनांतून समोर येत आहे. पुण्यातुन औरंगाबाद येथे काकडे यांच्या घरी एक पाहुणा आला होता.

काकडे यांनी त्यांचे यथोचित आदरातिथ्य केले. तासाभरानंतर या पाहुण्याने जेवण घेतले. जेवण वाढत असताना घरातील महिलेची नजर या पाहुण्याच्या हातावरील एका शिक्क्यावर गेली. तो शिक्का चक्क ‘होम क्वारंटाईन’ चा होता म्हणजे सदर पाहुण्याला त्याच्या स्वतःचे घर सोडले तर बाहेर पडायला परवानगी नव्हती. ही बाब काकडे कुटुंबाच्या लक्षात येताच सदर पाहुण्याने तिथून काढता पाय घेतला. थोड्या वेळानंतर ही बाब गल्लीतील इतर लोकांनाही समजली आणि सर्वजण हादरले. मंगळवारी सकाळी या घरातील चार सदस्यांना तपासणीसाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेवरून कोरोनाच्या संशयितांना सुध्दा या संसर्गाचे गांभीर्य नसल्याचे लक्षात आले आहे. जर ‘होम क्वारंटाईन’ लोकसुद्धा या पद्धतीने फिरू लागले तर या रोगाचा सामना करणे कठीण होईल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*