पोलीस दिसेल त्याला मारताहेत : अजित पवार

मुंबई :

धरला की ठोकला अशा पध्दतीने सध्या पोलीस काम करताना दिसत आहेत. पोलिस संचारबंदीच्या नावाखाली मारत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. पोलीस दिसेल त्याला मारताहेत असे म्हणत अजित पवारांनी काल पोलिसांना काही सूचना दिल्या.

काल एका पत्रकाराने गाडीवर प्रेस हे नाव चिकटून घेतले कारण पोलिसांना आयकार्ड दाखवेपर्यंत 2 फटके पडतील. किराणा मालाचा एका मोठ्या व्यापाऱ्याला काल पोलिसांनी चोपले ह्या घटना कशा टाळता येतील किंवा याची कुणाकडे तक्रार करता येईल अशा प्रतिक्रिया जनसामान्यांतुन येत असताना थेट उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची बाजू मांडली. अत्यावश्यक सेवा पुरविणारा जो कर्मचारी आहे, व्यापारी आहे त्यांना त्रास होता कामा नये अशा प्रकारच्या सूचना अजित पवार यांनी केल्या.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*