भारताने केले जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे ‘लॉक डाऊन’

नवी दिल्ली :

कोरोना(कोविड19) या व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे लॉक डाऊन करणे असल्याने भारताने देशभरातल्या तब्बल ५४८ जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन घोषित केलं आहे.

त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था कोसळू शकते असे तज्ञांचे मत आहे परंतु कोरोनाला रोखण्यासाठी हे करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. इटलीसारखीच स्थिती भारताचीही असू शकते, जिथे सुरुवातीला ही आकडेवारी फारशी धडकी भरवणारा नव्हती, परंतु अचानक वाढली आणि रुग्णालये कमी पडली असे मत तज्ञांनी व्यक्त केले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*