म्हणून WHO ने केले भारताचे कौतुक

दिल्ली :

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी भारतीय लोक ज्या पद्धतीने कोरोनाचा सामना करत आहेत त्याचे कौतुक सर्वत्र होताना दिसत आहे. अपुरी औषधी, साधनसामग्री या सगळ्याचा तुटवडा असतानाही त्याला थांबवण्याची शक्ती भारतीयांमध्ये आहे असे चित्र आता जगासमोर आहे. करोना थांबवणं आता तुमच्या हाती आहे असं म्हणत WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने भारताचं कौतुक केलं आहे.

भारताने देशभरातल्या ५४८ जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन घोषित केलं आहे. दिवसेंदिवस करोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने सरकारने हे पाऊल उचलले आहे. भारतात करोनाग्रस्तांची संख्या ४९९ वर पोहचली आहे. भारताने देशभरातल्या ५४८ जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन घोषित करून मोठे पाऊल उचलले आहे. अशा प्रकारची पावलं उचलणं भारताने सुरु ठेवलं पाहिजे असंही WHO ने सुचवलं आहे. WHO चे कार्यकारी संचालक मायकल जे रेयान यांनी भारताचं कौतुक केलं आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*