मोदींनी 6 वर्षांत जेवढे ‘कमावले’, तेवढे महिनाभरात गमावले

दिल्ली :

लाट म्हटलं की दोनच गोष्टी आठवतात एक म्हणजे मोदी आणि दुसरं म्हणजे कोरोना व्हायरस. सध्या कोरोनाने नको नको करून सोडले आहे. कोरोनाचा लाट थांबविण्यासाठी देशभरात लॉक डाऊन केले आहे. एक काळ होता मोदींचीही लाट होती. जगभरात असेल- नसेल पण देशात तरी होतीच.

नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ ला पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. लोकांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. त्यावेळी त्यांनी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काही ऐतिहासिक निर्णयही घेतले. या निर्णयांचा परिणाम असा झाला की अर्थव्यवस्थेबरोबरच शेअर बाजारातही जोर दिसू लागला. देशात गुंतवणूकदारांचा महापूर आला, पण यावेळी जेव्हा मोदींनी शपथ घेतली तेव्हापासून देशाची अर्थव्यवस्था घसरत चालली होती. त्यातच भर पडली कोरोनाची आणि मोदींची अवस्था जेवढे कमावले तेवढे गमावले अशी झाली. कोरोनाच्या लाटेने मोदींची लाट कमकुवत केली आणि त्यांच्याद्वारे सहा वर्षांत झालेली वाढ काही दिवसांत वाहून गेली.

केवळ मार्च महिन्यातच सेन्सेक्स १२३१६ अंकांनी घसरला आहे. सोमवारी बाजार उघडताच पहिल्या तासाभरातच गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी रुपये बुडाले. यावेळी सेन्सेक्स ३००० पेक्षा जास्त अंकांनी घसरला होता. शेअर विक्री कमालीची वाढल्याने शेअर तज्ज्ञांनाही याचे आकलन करणे कठीण झाले आहे. इतकी वाईट परिस्थिती आहे की ब्रोकरसुद्धा वर्क फ्रॉम होम करत आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*