“तर दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊ..”

हैदराबाद :

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन घोषित केला आहे.केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार आपपल्या राज्यात लोकांची मदत करत आहे. संचारबंदी लागू असली तरी काही नागरिक रस्त्यावर येत आहेत. त्यावर आता तेलंगनचे मुख्यमंत्री भडकले व त्यांनी थेट नागरिकांना गोळ्या घालण्याचे आदेश देऊ असे म्हटले.

मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी या काळात लोकांशी संवाद साधून, संयमाने बोलायला पाहिजे तर मुख्यमंत्री योग्य आहेत, लोकांना रस्त्यावर जायची गरज नाही अशा संमिश्र प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत.

जे लोक परदेशातून परतले आहेत आणि ज्यांना क्वारंटाईन होण्यास सांगितलं आहे, परंतु जे झाले नाहीत, त्यांचे पासपोर्ट जप्त करा. ज्यांना करोनाची लागण झाली आहे आणि ज्यांना क्वारंटाईन होण्यास सांगितलं आहे त्यांच्यावर सरकार नजर ठेवून आहे असंही राव स्पष्ट केलं.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*