ताली बजाओ आवाहनामुळे गांभीर्य संपले; शिवसेनेचा आरोप

मुंबई :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळी आणि थाळ्या वाजवण्याचे आवाहन केले होते. करोनाशी लढणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी देशातील लोकांनी टाळ्या व थाळ्या वाजविल्या. पण हे सगळं आपापल्या घरी, बाल्कनीत येऊन करण्यास सांगितले होते परंतु लोकांनी एकत्र येत गर्दी करत याचा उत्सव बनवला. त्यामुळे या विषयाचे गांभीर्य संपुष्टात आले असा आरोप शिवसेनेने केला आहे.

आपल्या पक्षाच्या मुखपत्रात म्हणजेच सामनात दिलेल्या अग्रलेखात त्यांनी म्हटले आहे की, या रोगाविषयी भीती आणि दहशत असल्याने तो विषय लोकांनी गांभीर्याने घेणे अपेक्षित होते आणि लोकांमध्ये हे गांभीर्य निर्माण झाले असतानाच पंतप्रधान मोदी यांनी लोकांना टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन लोकांनी रस्त्यावर येऊन टाळ्या वाजवत गर्दी केली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*