लॉकडाऊनमध्ये बोर झालेल्यांना डॉक्टर मशहुर गुलाटी यांनी दिला एक मजेशीर उपाय

मुंबई :

कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. आताच मिळलेल्या माहितीनुसार अमेरिकेत एकाच दिवसात 130 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी रात्री ८ वाजता मध्यरात्रीपासून ते १४ एप्रिल पर्यंत तब्बल २१ दिवस संपूर्ण देशंच लॉकडाऊन करणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे लोकांना घरी बसण्याची वेळ आली.

आता घरी ‘बसतात’ त्यांचं ठिके हो पण अनेकांना घरी बसून कंटाळा आला आहे..घरी बसून करावं तरी काय असा प्रश्न लोकांना पडलाय… कपिल शर्मा कॉमेडी शो मधील डॉक्टर मशहुर गुलाटी म्हणजेच कॉमेडियन सुनिल ग्रोवरने त्याच्या चाहत्यांना लॉकडाऊनमध्ये घरात टाईमपास कसा करावा यावर एक मजेशीर उपाय सूचवला आहे.

सुनील ग्रोवरने त्याच्या सोशल अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे..या व्हिडिओमध्ये त्याच्या हातात दोन वाट्या दिसत आहेत..यातील एका वाटीत तांदूळ तर दुस-या वाटीत मूग आहेत..सुनीलने ही दोन्ही धान्य एका वाटीत मिक्स केली आहेत..आणि मग पुन्हा त्यांना वेगळं करत आहे..हा व्हिडिओ शेअर करताना तो सांगतोय, ‘सकाळपासून तीन वेळा मी हे असं वेगळं वेगळं करतोय..हा एक मजेशीर गेम आहे.घरात रहा आणि सुरक्षित रहा..’ असं सुनीलने त्याच्या अंदाजात म्हटलं आहे..

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*