शिक्क्याचा गैरवापर, संचारबंदीत फिरण्यासाठी दिली ओळखपत्रे

अकोला :

कोरोनाला आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध प्रकारे प्रयत्न करत आहेत. जिल्हाधिकारी, पोलीस, मनपा कर्मचारी व इतर प्रशासकीय यंत्रणा गर्दी होऊ नये म्हणून वेगवेगळ्या कल्पना वापरत आहेत. पण या संचारबंदीत अन्न व औषध विभागाच्या शिक्क्याचा गैरवापर करून अनेक लोकांना ओळखपत्र वाटप करण्यात आली आहेत. कोरोना सारख्या रोगाला सामोरे जात असताना अकोल्याच्या औषध प्रशासन विभागाला काहीही गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.

अकोल्याच्या औषध विभागाच्या अधिकाऱ्यांचे शिक्के एका चंदू नामक खासगी व्यक्तीला देऊन त्याने संचारबंदी काळात शहरात वावरण्यासाठी अनेकांकडून पैसे घेऊन ओळखपत्र वाटप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजूनही त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नसल्याची माहिती आहे. चंदू अगदी परवा रात्रीपर्यंत ते शिक्के वापरून पैसे उकळत होता. औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर प्रकरणाचे गांंभीर्य नसल्याचे दिसून येत असल्याने केमिस्ट असोसिएशननेही विरोध दर्शविला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*