‘कोरोना’विरूध्द लढण्यासाठी ‘या’ खेळाडूनं दिले तब्बल 8 कोटी

बार्सिलोना :

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. एकीकडे यंत्रणा उभ्या करूनही प्रसार होतो आहे तर दुसरीकडे काही लोक अजूनही या व्हायरसला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. अमेरिकेत 130 बळी गेल्याची माहिती आज मिळत आहे. अशा परिस्थितीत फुटबॉलपटू मेसी आणि मॅंचेस्टर सिटीचे मॅनेजर पेप गॉर्डिओला यांनी कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी तब्बल10 लाख युरो देण्यीची घोषणा केली आहे.

भारतील चलनात हीच रक्कम 8 कोटी 20 लाख एवढी आहे. दिली जाणारी रक्कम बार्सिलोना येथील रुग्णालये तसेच अन्य आरोग्य सेवेसाठी वापरली जाणार आहे. याबाबत रुग्णालयाने ट्विटर हॅंडलवर म्हटले आहे की, कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी लियो मेसीने मदत केली आहे. त्याबद्दल लियो मेसीचे धन्यवाद आणि आभार.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*